व्हिडिओ

Anil Deshmukh Uncut : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

Published by : Team Lokshahi

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख म्हणाले की, अदृश्य शक्तीचा वापर करून हे सगळं करण्यात आलेलं आहे. काहीतरी सांगायचं आणि लोकांसमोर आपली बाजू मांडायचे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे शिवसेना पक्षासोबत आणि काल राष्ट्रवादी पक्षासोबत काय झालं. असं अनिल देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख म्हणाले, भाजपामध्ये अस्थिरता आहे. आमच्यामध्ये अस्तिरात नाही. वेगवेगळी आमिषं दाखवून ज्या आमदारांना त्यांनी तिकडे नेलं आहे. त्यापैकी बहुतेकजण नाराज आहेत. जे आमदार पक्ष सोडून गेलेत ते देखील निवडणुकीच्या वेळेस एक- एक करून घरवापसी करतील. अनेक आमदार शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत. आमचा पक्ष शरद पवार आहेत आणि आमचं निवडणूक चिन्हही शरद पवारच आहेत. असं अनिल देशमुख म्हणाले.

बीएमसी घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...