अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला 1 करोड 47 लाखांचे ड्रग्ज पकडल्याने वसई-विरार नालासोपारा परिसरात खळबळ माजली आहे. या पथकाने नालासोपाऱ्याच्या प्रगती नगर परिसरात ही कारवाई करून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. दिवाईन चुकवूमेका आणि चिकवु फ्रेडिंनंद ओकीतो नवमारी असे अटक नायजरियन आरोपीचे नावे आहेत.