लोकसभेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आणि त्या टीकेवर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी थेट प्रत्युत्तर दिले. अनुराग ठाकूर म्हणाले की, मागच्या वेळेस देखील मी म्हणालो होतो की, काही लोक संविधान तर हातात घेऊन येतात पण त्याची पान किती हे देखील त्यांना सांगता येत नाही कारण त्यांनी ते कधी उघडून पण पाहिलं नाही. राहुल गांधी जो संविधान सगळ्यांना दाखवतात त्याची दोन पान देखील त्यांनी उघडून पाहिली नसतील.
काँग्रेस पक्षावर निशाणा साधत पुढे अनुराग ठाकूर म्हणाले की, आज ते संविधान वाचवण्याच्या बोलतात, तर त्यांच्या पक्षाच्या राजवटीत शिखांचे गळे चिरले गेले. देशाच्या लोकशाहीचा गळा घोटून आणीबाणी लादली गेली तेव्हा सत्तेत असलेला काँग्रेस पक्षच होता....आज तुम्ही संविधान खिशात घेऊन फिरता, पण नुसतेच हिंडून काहीही साध्य होणार नाही,असं अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.