मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महायुती सरकारने हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते.
मात्र, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी ट्विटद्वारे दावा केला की, "एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ. बसवराज तेली यांचा अपवाद वगळता, इतर सर्व पोलिस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहेत." असा दाव केला होता.
आव्हाडांच्या या आरोपानंतर, एपीआय महेश विघ्वेंची उचलबांगडी करण्यात आली आहे. एपीआय महेश विघ्ने यांना वाल्मीक कराडसोबत फोटो काढणे अंगलट आले आहे. महेश विघ्ने यांच्यासोबत हवलादार मनोज वाघ यांनाही बाजूला सारले आहे.