व्हिडिओ

Modi vs Raut: 370 कलम हटवला पण जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली; राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

मोदी यांच्याकडे पूर्ण बहूमत नाही त्यामुळे 370 कलम हटवला पण जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली असा सवालही संजय राऊत उपस्थित करत आहेत.

Published by : Dhanshree Shintre

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला आहे. मोदी यांच्याकडे पूर्ण बहूमत नाही त्यामुळे 370 कलम हटवला पण जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली असा सवालही संजय राऊत उपस्थित करत आहेत.

370 कलम हटवला आणि त्याचं राजकारण केलं आणि मतं मागितली. 370 कलम काढल्यावर आम्ही आनंदाने त्याला पाठिंबा दिला. राज्यसभआ असेल, लोकसभा असेल अनेकांनी विरोध केला नाही पण 370 कलम हटल्यावर जम्मू काश्मीरच्या परिसरात काय सुधारणा झाली हे प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरुन सांगायला हवं. प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरुन भाषण करत असताना जम्मू-काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते आणि रक्ताचे सडे आमच्या जवाणांच्या रक्तांचे सडे आहेत हे त्यांनी विसरु नये. काय बदल झाला काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने अजून विधानसभेचे निवडणूका होऊ शकल्या नाहीत असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये