बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली. संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
तसेच आता सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना ही जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर आली होती. उद्या टॉवरवर चढून आंदोलन करत स्वत:ला संपवणार असा गंभीर इशारा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी सरकारला दिला आहे. याचपार्श्वभूमीवर अरविंद सावंत सरकारवर संतापले आहेत. त्यांनी सरकारवर आणि कायदा सुव्यवस्थेला जाब विचारलेला आहे.
ज्यादिवशी घोटाळे करणाऱ्यांना सोबत घेतलं तेव्हाच देशाचं संविधानच संपल...
दरम्यान अरविंद सावंत म्हणाले की, पोलिसांना का दोष देता ज्या दिवशी पंतप्रधानांनी '७० हजार करोड का घोटाळा हुआ, सिंचन घोटाळा हुआ...' बोलले होते ना? मग त्या सिंचन घोटाळ्याच्या माणसाला स्वतः सोबत घेतलं... वित्तमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं त्याच दिवशी समजायचं या देशाचं संविधानच संपल होतं... आणि आम्ही संविधान बोललो तर फेक नॅरेटिव्ह, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
कुठे आहे कायदा सुव्यवस्था?- अरविंद सावंत
पुढे अरविंद सावंत म्हणाले की, मग संविधान तिथेच संपल कारण, त्यांनी आरोप करून नंतर परत स्वतः सोबत घेतलं त्यांना पद दिली, त्यांना देशाची मंत्रिपद दिली तेव्हा खालच्यांना काय कळतं करा काही पण... कुठे आहे कायदा सुव्यवस्था? असा प्रश्न अरविंद सावंतांनी केला आहे.पुढे ते म्हणाले, कायदा सुव्यवस्था रसातळायला गेली आहे, महाराष्ट्राला लांछन लागलं आहे, लहान मुलींवर अत्याचार ज्या महाराष्ट्रात होतात त्या महाराष्ट्राला अभिमानाने बोलता येणार नाही... सरकारला बोलता