'सिकंदर' अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की 'सलमान खानच्या घरात घुसून त्याला ठार मारले जाईल. एवढेच नाहीतर सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची' धमकीही देण्यात आली आहे. वरळी पोलिस ठाण्यात फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आशिष शेलार म्हणाले की, "या देशातला किंवा महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षितच राहिला पाहिजे. नागरिकांच्या सुरक्षितेची काळजी सरकार पूर्णपणे घेईल. धमक्या देणारे घाबरत आहेत. ते स्व:ताचे अस्तित्व लपवत आहेत. कायदा आणि सुव्यस्था आपले काम चोक करत आहेत. सलमान खान असो किंवा कुणीही व्यक्ती असो, त्याची काळजी राज्यसरकार पूर्ण घेईल" असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.