नितेश राणेंनी केरळवरुन केलेल्या टीकेला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. जे भाजपाला सोडून काँग्रेसला मतदान करतात त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का..?असा सवाल काँगेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थीत केला आहे. नितेश राणेंनी केरळला मिनी पाकिस्तान म्हटलं होतं,तसेच 'राहुल गांधी, प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात,असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलं होतं. त्यावरुन आता अतुल लोंढेंनी पलटवार केला आहे.
नितेश राणे सारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का..?- अतुल लोंढे
याचपार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, नितेश राणे सारख्या व्यक्तीकडून अजून दुसरी आपण कोणती अपेक्षा करू शकतो... माझा प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे, ज्या संविधानाची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे... तो केरळ सारख्या राज्याला पाकिस्तान म्हणतो.. जे भाजपाला सोडून काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी म्हणतो.. त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का..? सा सवाल काँगेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थीत केला आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे ?
मिनी पाकिस्तान आहे केरळ हे राज्य, म्हणूनच तर तो राहुल गांधी आणि त्यांची बहीण तेथून निवडून येतात ना.... तिथे सगळे अतिरेकीच त्यांना मतदान करत आहेत म्हणून तर तिथून जिंकून येतात. अतिरेकींना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत...