विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निकालावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, आम्हाला एवढा वाईट निकाल येईल हे अपेक्षित नाही. मान्य नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिकांनी कोविडमध्ये काम केलं, मागच्या 5 वर्षात काम केलं. त्यानंतर 10 - 10 वर्ष जे आमदार कोणाच्या घरी जात नव्हते, कोणाला भेटत नव्हते. असे आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात. हे अशक्य आहे. मी खात्रीने सांगतो ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती. या ईव्हीएमची खूप मोठी भूमिका आहे. असे अविनाश जाधव म्हणाले.