अमरावती: स्वातंत्रदिनानिमित्त आमदार बच्चू कडू यांनी पर्यावरण रक्षणासाठी आणि अमरावती जिल्ह्यातील शहिदांना वंदन करण्यासाठी सायकल रॅलीचं आयोजन केलं होते. अमरावती शहरातील नेहरू मैदानापासून यावली शाहिद गावापर्यंत 30 किलोमीटर ही तिरंगा सायकल रॅली आहे. पर्यावरणाचे रक्षण हे देशहीतासाठी महत्वाचे असल्याचं सांगत बच्चू कडू यांनी स्वत: सायकल चालवत या रॅलीला सुरूवात केली.