हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज (रविवार १७ नोव्हेंबर) पुण्यतिथी आहे. या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळाला भेट देत नतमस्तक होतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तमाम शिवसैनिक भेट देत आदरांजली वाहतात.