भारताच्या शेजारील देश बांगलादेश आहे. या बांगलादेशाच्या निर्मितीसाठी भारताचा मोठा वाटा होता. बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत आहेत. तसेच इस्कॉन मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
याचपार्श्वभूमीवर बांगलादेशातील अत्याचाराचा निषेध हा आपल्या देशात केला जात आहे. आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढून हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. मुंबई, नवी मुंबई, घाटकोपर, अंबरनाथ, वर्धा पिंपरी-चिंचवड या ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत.