व्हिडिओ

Worli BJP Banner : आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपची बॅनरबाजी, वरळीकरांचे लाख लाख आभार बॅनर उल्लेख

आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपची बॅनरबाजी पाहयला मिळतेय. वरळीकरांचे लाख लाख आभार असे बॅनर पाहायला मिळत आहेत.

Published by : Dhanshree Shintre

आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपची बॅनरबाजी पाहयला मिळतेय. वरळीकरांचे लाख लाख आभार असे बॅनर पाहायला मिळत आहेत. वरळीमध्ये घटलेल्या मतांवरुन भाजपने ठाकरेंना डिवचलं आहे. तर वरळी मतदारसंघात आमदार आहेत आदित्य ठाकरे त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपने ही बॅनरबाजी केलेली आहे. तर वरळीकरांचे लाख लाख आभार असे बॅनर लावण्यात आलेले आहे. भाजपसेनेमध्ये नेमके कोणाला किती मतं होती, कोणी लिड घेतलेली होती त्याचा आकडा सुद्धा देण्यात आलेला आहे. वरळीमध्ये हे बॅनर लागलेले आहेत ज्या ठिकाणी अरविंद सावंत लोकसभेमध्ये उतरलेले होते. ते जरी जिंकून आले असतील तरी वरळी मतदारसंघामध्ये त्यांची कुठेतरी मतमोजणीच्या वेळी पिछेआड झाली होती.

वरळीकरांनी दिलेला जनादेश स्वीकारुन येणाऱ्या विधानसभेत वरळीकरांचा जास्तीत जास्त आशिर्वाद घेऊन लोकसभेची कसर भरुन काढू असा संदेश देण्यात आला. वरळी कोळीवाडा हेमांगी वरळीकरच्या 193 वॉर्डमध्ये 598 मतांनी मागे आणि किशोरी पेडणेकर 199 वॉर्डमध्ये 541 मतांनी अरविंद सावंत मागे पडले. उद्धव ठाकरे गटाला 64 हजार 844 मतं मिळाली. भाजप शिवसेनेला म्हणजे यामिनी जाधवांना मिळाली तब्बल 58 हजार129 मतं मिळाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

India- Pakistan Match : भारताचा पाकिस्तानवर विजय, पण हस्तांदोलन टाळून खेळाडूंनी दिला ठाम संदेश

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला