व्हिडिओ

Amaravati : कॉफी पिताय सावधान! कोल्ड कॉफीच्या ग्लासमध्ये आढळले काचेचे तुकडे

अमरावतीत हॉटेलमधील कॉफीच्या ग्लासमध्ये काचेचे लहान-मोठे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अमरावतीत हॉटेलमधील कॉफीच्या ग्लासमध्ये काचेचे लहान-मोठे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील कॅम्प परिसरामध्ये हा सगळा प्रकार पाहायला मिळाला आहे. तरुणांकडून हॉटेल प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न याठिकाणी ऐरणीवर आहे. कॉफी पिताना अचानक काचेचे तुकडे दिसल्याने ग्राहकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या तरुणांनी हॉटेल संचालकाला जाब विचारला. या प्रकारामुळे हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन