नव्या वर्षात केशकर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. दाढी कटींगसह ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये 25 ते 30 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतला आहे. सलुनसाठी लागणाऱ्या वस्तू आणि जीएसटी दरांमुळे वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.