खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केली असल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात केला आहे. वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली पण कंपनीने दिली नाही यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिल होत. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीने दावा केला आहे.