सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता. त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले. तर पीएसआय राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील बसंत बीहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटले. त्याचाच सीसीटिव्ही व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.