रायगड च्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती केल्याने जिल्ह्यातील शिवसेने मधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतप्त शिवसैनिकांनी काल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास रोखून धरली होती. आज प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गोगावले यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी निवासस्थानी गर्दी करून एक मेळावा घेतला यावेळी अनेकांची आक्रमक भूमिका पहाता सर्वांनी शांत रहावे शासनाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन भरत गोगावले यांनी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर नेमकं काय घडले याचे तपशील दिले जाईल असे आश्वासन दिले.