अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केल होत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या त्या वक्तव्यावर राजकीयवर्तुळात पडसाद उमटताना पहायला मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर भास्कर जाधव म्हणाले की, असं आहे की... गृहमंत्र्यांनी असंवक्तव्य केलं असेल तर ती खूप गंभीरतेची बाब आहे, मोठा प्रश्न आहे हा की, देशाचे गृहमंत्री अशा प्रकारच्या घटनाकारवर बोलत आहे.... तुम्हाला माहित असेल की, भाजप पक्षाला पहिल्यापासूनचं घटनाकार आणि घटनांच्या विरुद्ध त्यांचे नेहमी मन लागलेले आहे. 'जे पोटात होत ते ओठात आलं' मी पहिल्यापासून बोलत होतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत यांचा विरोध कुठे ना कुठे लपलेला होता.
अमित शाह राज्यसभेत म्हणाले की,
अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले की, 'आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.' असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं.