अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेतील महिलांच्या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाच्या मदतीने घेतली जाणार आहे. दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार. त्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. जास्त उत्पन्न असताना या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे वगळली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.