मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोरक्या वाल्मीक कराड याची संपत्ती जप्ती झाल्या नंतर आता आरोपी सुदर्शन घुले आणि फरार असलेला आरोपी कृष्ण आंधळे यांची ही संपत्ती सीआयडी आणि एस आय टी कडून जप्त करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली.
तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कृष्ण आंधळे याच्याकडे पाच विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपी सुदर्शन घुलेची देखील संपत्ती जप्त करण्यात आली आहे.