Lokshahi Update Team Lokshahi
व्हिडिओ

बिहारमधील राजकारणाचा मुंबई मनपा निवडणुकीवर परिणाम होणार

बिहारमध्ये भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केली...महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करता आले असतांना बिहार गमवावे लागले

Published by : Team Lokshahi

बिहारमध्ये भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केली...महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करता आले असतांना बिहार गमवावे लागले... बिहारमधील या घडामोडींचा परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होणार आहे....पाहू या लोकशाहीचा विशेष रिपोर्ट...

बिहारमध्ये नितीश कुमार नवे गडी, नवे सरकार स्थापन करत सत्ता मिळवली. बिहारमध्ये नितीश यांच्या संयुक्त जनता दलाबरोबर आता भाजप नसणार आहे. बिहारमधील या घडामोडींचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीवर होणार आहे. मुंबईतील भाजपच्या पाठीमागे असणारा उत्तर भारतीय मतदारांमध्ये उभी फूट पडणार आहे. बिहारी मतदार आता नितीश कुमारच्या पाठीशी असणार तर उत्तर प्रदेशातील मतदार योगी आदित्यनाथसोबत असेल. म्हणजेच बिहारी मतदारांची मते भाजपकडून शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार का झाले भाजपपासून दूर

2024 मध्ये विरोधी पक्षांतर्फे पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा

महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरी, जदयूला बिहारमध्ये पुनरावृत्तीची भीती

आरसीपी सिंहच्या माध्यमातून जदयूत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न

भाजपने बिहारच्या सर्व जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा, जदयूला अडचण

जातीय जनगणना, धार्मिक मुद्द्यांवर नितीश यांच्यांसाठी अडचणीचे ठरत होते

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी नितीश कुमार शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणार आहे. यामुळे भाजपकडे असणारा बिहारी मतदार शिवसेनेकडे वळणार आहे. यामुळे मुंबई भाजपला नवीन रणनिती तयार करावी लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या