राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मोहनराव भागवत यांनी मुस्लमानांवर केलेल्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यामांशी संवाद साधला आहे. राऊत म्हणाले की, मुस्लमानांनी एकत्र काम करावे. तसेच त्यांचा आणि आमचा डीएनए एक आहे. असे मोहनराव भागवत वारंवार बोलतात. पण मुस्लमानांना विरोधसुद्धा त्यांच्या पक्षातील काही व्यक्ती करतात. मोहनराव भागवत यांनी त्यांच्या तोंडाला शिलाई मारली पाहिजे. कितीही नाही बोले तरी भाजप त्यांनी बनवलेला पक्ष आहे. असे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.