भाजपची स्टार प्रचारक व प्रसिद्ध गायिका आमदार मैथिली ठाकूर उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रचारात त्या मुंबईतील १० वॉर्डमध्ये साद घालतील आणि मुंबईकरांना मतदानासाठी प्रेरित करतील.
त्यांच्या गाण्यांद्वारे आणि भाषणांद्वारे मतदारांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. मैथिली ठाकूर यांच्या या दौऱ्यामुळे भाजपला मोठा फायदा होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे स्टार प्रचारकांचे निवडणूक क्षेत्रात दौरे वाढले आहेत. मैथिली ठाकूर यांच्या या प्रचार दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्या गाण्यांद्वारे मतदारांना आवाहन करतील.