Municipal Corporation 
व्हिडिओ

Municipal Corporation : कांदिवलीमध्ये महापालिकेची बुलडोझर कारवाई सुरू

Kandivali News: कांदिवलीतील एसव्ही रोड आणि मथुरादास रोडवर बीएमसीने बेकायदेशीर अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई सुरू केली.

Published by : Dhanshree Shintre

कांदिवली पूर्वेकडील एसव्ही रोड आणि मथुरादास रोडवर बेकायदेशीर अतिक्रमणांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मोठी बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील फुटपाथ लोकांसाठी मोकळे होणार आहेत.

काल उच्च न्यायालयाने मुंबईतील फुटपाथवरील बेकायदेशीर अतिक्रमणांवर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने आज (ता. १३) लगेच कारवाईला सुरुवात केली. कांदिवलीतील या प्रमुख रस्त्यांवर दुकाने, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणांवर बुलडोझर चालवून खोदकाम सुरू केले गेले. या भागात वाहतूक कोंडी आणि पायी चालणाऱ्यांसाठी असुविधा निर्माण झाली होती, जी आता दूर होणार आहे.

बीएमसीच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, काही व्यापाऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली असून, प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण दिले जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईभर अशा कारवाया तीव्र होणार असल्याचे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा