कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. 500 पानांचे दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी वानवडी येथील लष्कर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
अत्याचार करणाऱ्या दोघांना पीडितेसह तिच्या मित्राने ओळखले असून शोएब बाबू शेख आणि चंद्रकुमार कनोजिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.