टोरेस प्रकरणातील घोटाळ्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर वारंवार त्याप्रकरणा संबंधित विडिओ अपलोड करणे सुरूच आहे. काल पुन्हा नवीन विडिओ अपलोड करण्यात आला आहे, आणि या व्हिडिओ मधून गुंतवणूक दारांना या प्रकरणातील दोषी लोकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. टोरेस दुकानात लूटमार झाली असून ती लूटमार आणि दुकान तौफिक रियाझ याने प्लॅन करून लुटले असल्याचे सांगितले आहे.
या टोरेस दुकानात काम करणारे ऐकून 49 लोकांची नाव देण्यात आली आहेत, आणि पुन्हा टोरेस कंपनी कडून नागरिकांना पैसे देणार असल्याचे आमिष देण्यात येत आहेत. टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील 3 आरोपींना 6 जानेवारीला मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं होतं. या सुनावणी दरम्यान तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही पोलीस कोठडी आज संपत असून आज पुन्हा या तिन्ही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अशातच टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं मुंबईतील टोरेस कंपनीच्या कार्यालयावर आज पुन्हा एकदा पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली आहे. आजच्या छापेमारीमध्ये पोलिसांनी मोठमोठ्या बॉक्समध्ये काही डॉक्युमेंट्स, फाईल, लॅपटॉप, ज्वेलरी हे सगळं जप्त करून मोठमोठ्या बॉक्समधील कंपनीमध्ये असलेला मुद्द्यामाल जप्त केला आहे. मुंबईसह नवी मुंबई आणि इतर ठिकाणी टोरेज कंपनीच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई होत असताना पाहायला मिळत आहे.