नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर फिरवण्याची कारवाई सुरू झाली आहे. संजय बघ कॉलनी परिसरात असलेल्या या घरात अनाधिकृत बांधकाम केल्याची नोटीस नागपूर महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. त्यानंतर घरातील सर्व साहित्य बाहेर काढून घर पाडण्याची कारवाई आता सुरू झाली आहे. तीन जेसीबी मशीन घर पाडण्यासाठी या ठिकाणी आणण्यात आल्या आहे.