दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज दिल्लीत निवडणुका होत आहेत. दिल्लीच्या निवडणुकांमध्ये यमुनेच्या विषारी पाण्याचा मुद्दा रंगला होता.
दिल्लीच्या निवडणुकांमध्ये यमुनेच्या विषारी पाण्याचा मुद्दा रंगला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हरियाणात गुन्हा दाखल झाला आहे.हिंदुंच्या धार्मिक भावना भडकावल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप केला गेला आहे.
2 राज्यांतील चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. यमुनेच्या विषारी पाण्याचावरुन केजरीवालांनी टीका केली होती. हरियाणा सरकारवर केलेल्या टिके विरोधात हरियाणाच्या मंत्र्यांनी कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.