अखंड महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत जेजुरी गडावर उद्यापासून चंपाष्टमी षडरात्र उत्सवाची सुरवात होत आहे. करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिह भारती यांच्या हस्ते श्री खंडोबा आणि म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तीची घटस्थापना होऊन चंपाष्टमी उपासनेला सुरवात होणार आहे. जेजुरीत चंपाष्टमी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.