उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी हाक देत माजी खासदार चंद्रकांत खैरे कार्यकर्त्यांसमोर भर व्यासपीठावरच नतमस्तक झाल्याचे पहायला मिळाले. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठी गळती पाहायला मिळत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंगमंदिर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा शनिवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी पक्षाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका असं म्हणत हात जोडून कार्यकर्त्यांसमोर चंद्रकांत खैरे नतमस्तक झाले.