मुंबईत मनेस विरूद्ध उत्तर भारतीय वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता दिसून येत आहे. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर आता मनसे नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भैयांच्या मुंबईतील अस्तित्वावरच आता प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.
याचपार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष सुनील शुक्ला यांना समर्थन करत नाही आहे. त्यामुळे मनसेने असा विचार करु नये, त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सुद्धा असा विचार करु नये. कोणी खालच्या लोकांनी असा विचार केला असेल तर तो त्यांनी काढून टाकावा. भारतीय जनता पक्ष मनसेबद्दल असा विचार कधीच करणार नाही "