महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्याचे सदस्यांनी शस्त्रांसह त्यांच्या परंपरांचे अद्भुत प्रात्यक्षिक दाखवलं आहे. तलवारी आणि इतर शस्त्रे हाती घेऊन त्यांनी त्यांच्या परंपरेचं दर्शन घडवलं आहे. हर हर महादेवच्या जयघोषात आणि घोषणांमध्ये संपूर्ण वातावरण उत्साह आणि श्रद्धेने भरलेले होतं. किन्नर आखाड्याच्या या कार्यक्रमाचे आयोजन 2025च्या महाकुंभात करण्यात आलं होतं.
महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा किन्नर आखाड्याकडून करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.