जळगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शासकीय नोकरी लावून देतो असे, अमिष दाखवून 5.50 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याकडून साडेपाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पाच जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकर जावळे यांच्याकडून २०१८ पासून मुलाला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत पाच जणांनी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात पैसे उकळले. मात्र, मुलाला नोकरी न लागल्याने जावळे यांनी पैसे परत मागितले. पैसे न मिळल्याने जावळे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.