मुंबई : सर्व काही एकतर्फी सुरु आहे. मराठा मागास दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. ओबीसींना धक्का मारुन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. ओबीसी समाज पण मतदान करतो विसरु नका. सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही, असेही भुजबळांनी विचारले आहे.