मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लागण्याची शक्यता आहे, त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, “आमचा सगळया लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री पदी असावा असा अट्टहास, अशी इच्छा होती. ती पूर्ण झालीय. येणाऱ्या दिवसात त्यांच्या सेनापतीच मंडळ दिसेल. मी असेन किंवा नसेन त्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींचा समावेश झाल्याशिवाय राहणार नाही” “भाजपकडे तीन-चार टर्मच्या महिला आमदार आहेत. आज सगळ्यात जास्त महिला आमदार भाजपच्या आहेत. मागच्या टर्ममध्येही भाजपच्या महिला आमदाराची संख्या जास्त होती. येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी मंत्रिमंडळात दिसतील” असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. खातेवाटपावर महायुतीत एकवाक्यात दिसत नाही, एकनाथ शिंदे समाधानी दिसत नाहीत, या प्रश्नावरही चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं.