लाडकी बहिणीच्या छानणीवरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. निकष न पाहता लाडकी बहिण योजनेतून पैसे दिले निवडणुकांमध्ये पंधराशे रुपयात मत विकत घेण्याचा प्रसत्न झाला आहे, असं संजय राऊक म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या टीकेवर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
राऊतांना लाडकी बहिण योजना बंद करायची आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तसेच पुढे त्या म्हणाल्या की संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांच्या नावावर फॉर्म भरले त्यातल्या काहींना अटक देखील झाली. राऊतांना लाडकी बहिण योजना बंद करायची आहे, पण आम्ही ते अजिबात होऊ देणार नाही....संजय राऊत जे बोलत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या डोक्यावर पुर्णपणे परिणाम झाला आहे.