व्हिडिओ

Chitra Wagh On Uddhav Thackarey: ठाकरेंना पराभव दिसत असल्याने ते बिथरलेत; वाघ यांची ठाकरेंवर टीका

सध्या उबाठांचा निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणाऱ्या बॅग्सचा व्हिडिओ फिरतोय. यातचं चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Published by : Team Lokshahi

सध्या उबाठांचा निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणाऱ्या बॅग्सचा व्हिडिओ फिरतोय. यातचं चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उध्दव ठाकरेंना समोर पराभव दिसत असल्याने ते बिथरले आहेत असं चित्रा वाघ यांनी म्हणटलं आहे. बॅगा फक्त तुमच्याच तपासल्या जात नाही आहेत तर त्या सगळ्यांच्याच तपासल्या जात आहेत. प्रत्येक जण उद्धव ठाकरेंसारखा लहान सहान गोष्टींवर कांगावा करत नाही पण हे मात्र कांगावा करताना ते दिसता आहेत असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

तर पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, आहो उध्दव जी, बॅगा फक्त तुमच्या तपासल्या जात नाही तर प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मात्र प्रत्येक जण तुमच्यासारखा कांगावा करत नाही. आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही. चला तुम्हाला देवेंद्रजींचा व्हिडिओ पाहायचा होता ना हा घ्या व्हिडिओ.

7 नोव्हेंबर चा व्हिडिओ आहे बर नाही तर परत कांगावा कराल. पण हा कांगावा करत असताना वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरेंचा मुळ स्वभाव पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे. उद्धव जी तुम्ही विसरलात ही लोकशाही आहे इथे गुंडाशाहीला थारा नाही, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा