देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारावेळी त्यांचे निधन झालं आहे.
संपुर्ण राजकीयवर्तुळातातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्वीट करत म्हणाले की, 'आपले माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक महान अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी गमावला आहे. 10 वर्षे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या मनःपूर्वक संवेदना. ॐ शांति !'