भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षात कुठेही असमन्वय नाही महायूती म्हणूनच लढत आहोत. ज्यानी एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरले आहेत ते अर्ज मागे घेतील अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे. पुण्यात कोथरूड मतदार संघात चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधातच अजित पवार यांचे बाबुराव चांदणे यांनी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळेच महायुतीत काही अलबेल नाही असे चित्र निर्माण झाले होता मात्र भाजपकडून सगळं काही अलबेल असल्याच सांगण्यात येत आहे.