शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एक रुपयात पिक विमा योजना अत्यंत महत्त्वाची असून शासनाने ही योजना बंद करू नये. निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिली गेली, शेतकऱ्याच्या जीवावर निवडणुका लढवल्या गेल्या.
आता शेतकऱ्यांची महत्त्वाची योजना एक रुपयात पिक विमा ही योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू असून हे अत्यंत चुकीचं आहे. ही योजना बंद करू नये अन्यथा रस्त्यावर उतरून याचा निषेध करू अशी प्रतिक्रिया जालन्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.