आज महायुतीचा महाशपथविधी आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती पाहायला मिळाली. तर या शपथविधीला देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
अशातच शपथविधी सोहळ्यामध्ये शिवसेनेचे काही आमदार शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दादा भुसे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे, तर परिवहन खात्याची जबाबदारी त्यांना मिळण्याची दाट शक्यता दर्शविली जात आहे. शिंदेसेनेचे नेमके कोणते नेते मंत्रिमंडळामध्ये सामिल असतील कोणती खाती त्यांना मिळतील याविषयी उत्सुकता लागली आहे.