व्हिडिओ

Pune : गोविंददेव गिरी महाराजांकडून दत्तभक्ती कथन

पुणे- सातारा रस्त्यावरील शंकर महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी समाधी ट्रस्ट ने प. पू. श्री गोविंददेव गिरी महाराज यांचा श्रीदत्तभक्ती कथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Published by : Team Lokshahi

पुणे- सातारा रस्त्यावरील शंकर महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी समाधी ट्रस्ट ने ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान प. पू. श्री गोविंददेव गिरी महाराज यांचा श्रीदत्तभक्ती कथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्तानें स्वामीजींच्या भक्ती भावाने ओथंबलेल्या वाणीतून दत्त महात्म्य श्रवण करण्याची नामी संधी पुणेकरांना मिळाली.

श्री गोविंददेव गिरी महाराज हे रामजन्म भुमी अयोध्या येथे मंदिर समीतीचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. दत्तमहात्म्य सांगताना महाराजांनी माता अनुसया, भक्त प्रल्हाद, पुंडलिक यांची गुरूवरील निस्सीम भक्तीची उदाहरणे आपल्या रसाळ वाणीने देत भक्तांना दिव्यानुभूती दिली. कथनापूर्वी श्री दत्त महाराजांची आरती आणि पोथीची पुजा करण्यात आली.

समाधी ट्रस्ट चे विश्वस्त डॉ मिहिर कुलकर्णी , सतीश कोकाटे, सुरेंद्र वाईकर,पी. डी. पाटील, राजा सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले आदी विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल