मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पदाबाबत आम्ही कधीही मागणी केली नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेमुळे विलंब होत नाहीये, भाजपचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलंय असं देखील केसरकर म्हणाले. त्यामुळे विलंबाबाबत शिवसेनेवर ज्या काही टीका केल्या जात आहेत त्यामागे केवळ विरोधकांचाच हात आहे असा पलटवार केसरकरांनी केलाय.