छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. दर दोन दिवसाला एक रुग्ण डेंग्यूचा आढळत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली असून जनजागृती मोहीम आरोग्य यंत्रणे कडून राबवली जात आहे. पावसाळ्यामध्ये अनेक साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून या आजारावर उपाय म्हणून आता आरोग्य यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे.