देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाले आहेत. फडणवीस विमानतळावर पोहोचताच नागपूरकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. नागपूरमध्ये पोहोचताच फडणवीसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. फडणवीसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 18 फूट उंच रथातून विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. या स्वागत रॅलीमध्ये नागपूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले.