बारामतीत धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. सरकारनं धनगर आरक्षणाचा प्रश्न दोन दिवसांत न सोडवल्यास पाणीही सोडून देण्याचा इशारा उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडेंनी दिला असून गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाच्या तरुणांचे बारामतीत आदिवासी आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.