डिजिटल अरेस्ट स्कॅमद्वारे सायबर चोरट्यांनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान मुंबईत 'डिजिटल अरेस्टचं' एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका ८६ वर्षीय महिलेची तब्बल २० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित वृद्ध महिलेला फोन केला होता. आधार कार्डचा अवैध कामासाठी वापर झाल्याचे सांगून पीडितेच्या खात्यामधील पैसे विविध बँक खात्यात वळवण्यात आले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे. यासाठी आरोपींनी 'डिजिटल अरेस्ट' सारखे तंत्र वापरले. डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान पीडित महिलेने २०.२५ कोटी रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यामध्ये वळवले आहेत.