व्हिडिओ

Bhavana Gawali: भावना गवळींच्या बॅनरवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आऊट, बॅनरवर केवळ पंतप्रधान मोदींचा फोटो

खासदार भावना गवळी यांच्या बॅनरची चर्चा सुरू आहे कारण त्या बॅनरवर केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि खासदार भावना गवळी यांचेच फोटो आहेत.

Published by : Team Lokshahi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी भारी येथे महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी येत आहे. त्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्र्यांचे स्वागत करणारे बॅनर शहरात झळकले आहे.

खासदार भावना गवळी यांच्या बॅनरची चर्चा सुरू आहे. कारण त्या बॅनरवर केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि खासदार भावना गवळी यांचेच फोटो आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा फोटो नाही आहे. त्यामुळे या बॅनरवरून सध्या चर्चांना उधाण आलं आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भावना गवळी यांची दावेदारी तळ्यात-मळ्यात आहे. पाच वेळा निवडून आल्यावर यावेळी त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत आहे. हीच नाराजी या बॅनरबाजीतून व्यक्त झाल्याची चर्चा रंगत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?