विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "एमएमआरडीए, रस्ते घोटाळा यांसारखे घोटाळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कुरुलकरांच्या प्रकरणात पुढे काय झाले?, कोणत्याही संस्थेने कोणाशी असलेले संबध न पाहता देशविरोधी कारवाई करावी. महापुरुषांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले नाही पाहिजे." असे शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.